February 15, 2026

-प्रेसनोट प्रसिद्धीसाठी-लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात कल्पवृक्ष महोत्सव आणि पुष्पराखी आरासश्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे नारळी व राखीपौर्णिमेनिमित्त आयोजन

0
IMG-20250807-WA0033
Spread the love

पुणे : नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनानिमित्त बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात भव्य पुष्पराख्या आणि नारळांची आरास करुन कल्पवृक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. विविधरंगी फुलांनी साकारलेल्या भव्य राख्या आणि शहाळांची आरास पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली.

ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार यांनी सांगितले की दरवर्षी दत्त मंदिरातील भव्य पुष्प राख्या हा भाविकांमध्ये कुतूहलाचा विषय असतो. सामाजिक बांधिलकीच्या भावनेने बालग्राम संस्थेमधील निराधार आणि बालकल्याण संस्थेतील दिव्यांग अशा सुमारे २०० मुलामुलींना रक्षाबंधन निमित्त राख्या आणि मिठाई पाठविण्यात आली.

कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उप उत्सव प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनिल रुकारी, राजेंद्र बलकवडे आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील मंदिरात करण्यात आले.

पौर्णिमेनिमित्त दत्तयाग देखील मंदिरामध्ये होणार आहे. फुलांच्या राख्या आणि कल्पवृक्षाच्या प्रतिकृतीच्या सजावटीसह आकर्षक विद्युतरोषणाई हे देखील वैशिष्टयपूर्ण आहे. ही आरास शनिवार, दि. ९ आॅगस्ट पर्यंत भाविकांना पाहण्यासाठी खुली राहणार आहे. तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

  • फोटो ओळ : बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मंदिरात कल्पवृक्ष महोत्सवांतर्गत पुष्प राखी व शहाळे यांची आकर्षक सजावट मंदिरात करण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी