February 15, 2026

-झुला उत्सवात श्री महालक्ष्मीसह देवतांच्या मूर्ती पाळण्यामध्ये विराजमानश्री महालक्ष्मी मंदिर सारसबागेच्यावतीने आयोजन ; मंदिरात दररोज विविध प्रकारची आकर्षक पुष्पआरास

0
IMG-20250809-WA0048
Spread the love

पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात झुला उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये श्री महालक्ष्मी देवीसह श्री महासरस्वती, श्री महाकाली आणि श्री विष्णू यांच्या मूर्ती पाळण्यामध्ये विराजमान झाल्या. यानिमित्ताने मंदिरात फुलांची आकर्षक सजावट व दीपप्रज्वलनासह विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

दरवर्षी श्रावण महिन्यात झुला उत्सव आयोजित करण्यात येतो. ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली हा उत्सव मंदिरात सुरु आहे. विविध फुले, भाज्या, फळे, राखी वापरून दररोज वेगवेगळ्या प्रकारे झुला सजवण्यात येतो. मंदिरात हजारो भाविक यावेळी दर्शनासाठी येत असतात.

अमिता अग्रवाल म्हणाल्या, श्री महालक्ष्मी मातेचा जयघोष करीत झुला उत्सव थाटात साजरा केला जातो. यामध्ये श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली आणि श्री विष्णू यांच्या मूर्ती गाभा-यातून आणून सभामंडपात पाळण्यामध्ये ठेवल्या जातात. उत्सवाच्या निमित्ताने सभामंडप आणि मंदिर परिसरात विविध फुले व इतर गोष्टी वापरून सजावट करण्यात येते. तसेच दररोजची सायंकाळी ७.४५ वाजता झुला आरती केली जाते. यंदा अंगारकी चतुर्थीला अष्टविनायक आरास देखील करण्यात येणार आहे. हा उत्सव दि. १२ आॅगस्ट पर्यंत सुरु राहणार असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

*फोटो ओळ : श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने श्रावण महिन्यात मंदिरात झुला उत्सव आयोजित करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी