टाटा मोटर्सची नवी अॅडव्हेंचर एक्स परसोना लाँच,किंमत १८.९९ लाख रूपयांपासून सुरूआजपासून डिलिव्हरीजना सुरूवात
पुणे, ऑगस्ट ५, २०२५: टाटा मोटर्स कंपनीने आज त्यांच्या प्रमुख एसयूव्ही टाटा हॅरियर आणि टाटा सफारीमध्ये ऑल-न्यू अॅडव्हेंचर एक्स परसोना लाँच केली. या नवीन परसोनासह कंपनीने साहस, कार्यक्षमता आणि सर्वोत्तम वैशिष्ट्यांचे परिपूर्ण पॅकेज सादर केले आहे, जेथे ही ग्राहकांना उत्तम मूल्य प्रस्ताव आणि प्रबळ व साहसी जीवनशैलीचा अनुभव देत आहे.
आकर्षक दरामध्ये सेगमेंट-फर्स्ट वैशिष्ट्ये असलेल्या हॅरियर व सफारी अॅडव्हेंचर परसोनामध्ये एडीएएएससह अॅडप्टिव्ह क्रूझ कंट्रोल (एटी), ३६०० एचडी सराऊंड व्ह्यू, ट्रेल होल्ड ईपीबीसह ऑटो होल्ड, ट्रेल रिस्पॉन्स मोड्स (नॉर्मल, रफ, वेट), लँड रोव्हर-संचालित कमांड शिफ्टर (एटी) अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये, तसेच विभागातील अग्रणी वैशिष्ट्ये जसे एर्गो लक्स ड्रायव्हर सीटसह मेमरी अँड वेलकम फंक्शन, २६.०३ सेमी अल्ट्रा-व्ह्यू ट्विन स्क्रिन सिस्टम, ट्रेल सेन्स ऑटो हेडलॅम्प्स, अॅक्वा सेन्स वायपर्स आणि मल्टी ड्राइव्ह मोड्स (सिटी, स्पोर्ट, इको) आहेत. हे परसोना आजपाासून हॅरियर अॅडव्हेंचर एक्ससाठी १८.९९ लाख रूपये आणि सफारी अॅडव्हेंचर एक्स+ परसोनासाठी १९.९९ लाख रूपये या सुरूवातीच्या किमतीमध्ये उपलब्ध असतील.
या नवीन व्हेरिएण्टच्या लाँचसह टाटा मोटर्सने हॅरियर व सफारी लाइनअपची आकर्षकता वाढवली आहे. जेथे ही श्रेणी आता अधिक उच्च एसयूव्ही विभागामध्ये अधिक स्मार्ट, सुसंगत आणि मूल्य-संपन्न बनली आहे. सुव्यवस्थित परसोना रचना, वैशिष्ट्य-संपन्न व्हेरिएण्ट्स आणि नवीन रंगांच्या पर्यायांसह ही लाइन-अप नवीन प्युअर एक्स परसोनासह देखील येते, जी ग्राहकांना आकर्षक दरामध्ये वाढीव मूल्य देईल.
किमतीबाबत तक्ता
परसोना सुरूवातीची किंमत रूपयांमध्ये (ईएसपी, नवी दिल्ली)*
हॅरियर स्मार्ट १४,९९,९९०
प्युअर एक्स १७,९९,०००
अॅडव्हेंचर एक्स १८,९९,०००
अॅडव्हेंचर एक्स+ १९,३४,०००
फीअरलेस एक्स २२,३४,०००
फीअरलेस एक्स+ २४,४४,०००
सफारी स्मार्ट १५,४९,९९०
प्युअर एक्स १८,४९,०००
अॅडव्हेंचर एक्स+ १९,९९,०००
अकॉम्प्लीश एक्स २३,०९,०००
अकॉम्प्लीश एक्स + (७एस) २५,०९,०००
अकॉम्प्लीश एक्स + (६एस) २५,१९,०००
हे उदयोन्मुख नवीन परसोना ‘अॅडव्हेंचर एक्स’ लाँच करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. विवेक श्रीवत्स म्हणाले, ”हॅरियर आणि सफारी नेहमी गतीशीलतेपेक्षा अधिक सुविधेसाठी ओळखल्या गेल्या आहेत. या एसयूव्ही दर्जा, उद्देश आणि साहसी जीवनशैलीसाठी सखोल रूजलेली महत्त्वाकांक्षा सादर करतात. अॅडव्हेंचर एक्स परसोनाच्या लाँचसह आम्ही नवीन युगासाठी या आयकॉन्सचे आधुनिकीकरण केले आहे, जे व्यक्तिमत्त्व, अचूकरित्या तयार केलेली डिझाइन आणि सर्वोत्तम क्षमतेमध्ये अग्रस्थानी आहेत, तसेच प्रति कार अधिक मूल्य देतात. प्रामाणिकपणा, क्षमता व अभिव्यक्तीचा शोध घेणाऱ्यांसाठी डिझाइन करण्यात आलेल्या अॅडव्हेंचर एक्सची किंमत विभागामध्ये लक्षवेधक व किफायतशीर आहे, तसेच या एसयूव्हीमध्ये दर्जात्मक वैशिष्ट्ये आहेत. याव्यतिरिक्त, या नवीन परसोनासह आम्ही हॅरियर आणि सफारी लाइन-अपला पूर्णत: नवीन लूक दिला आहे, ज्यामुळे ही श्रेणी उच्च एसयूव्ही क्षेत्रात पूर्वीपेक्षा अधिक सर्वोत्तम, सुव्यवस्थित आणि मूल्य-संपन्न बनली आहे.”
हॅरियर व सफारी अॅडव्हेंचर एक्स परसोना बाबत – प्रत्येक प्रदेशामध्ये साहसी प्रवासाचा अनुभव
अॅडव्हेंचर एक्स हॅरियर व सफारी लाइन-अप खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांसाठी वैशिष्ट्यांनी संपन्न पर्याय आहे. लँड रोव्हरच्या लीजेण्डरी डी८ प्लॅटफॉर्ममधून घेतलेल्या प्रमाणित ओएमईजीएआरसी आर्किटेक्चरवर निर्माण आणि शक्तिशाली २.० लीटर क्रियोटेक डिझेल इंजिनची शक्ती असलेले हॅरियर व सफारी अॅडव्हेंचर एक्स परसोना कार्यक्षमता-संचालित अनुभव देतात. साहसी व आकर्षक उपस्थितीसह हॅरियर व सफारी प्रत्येक रस्त्यावर सर्वांचे लक्ष वेधून घेतात, जेथे सर्वोत्तम प्रमाण, उच्चस्तरीय बोनेट आणि उत्साहवर्धक ड्रायव्हिंग स्थितीच्या माध्यमातून अस्सल एसयूव्हीचे पैलू दिसून येतात. विशिष्टतेला अधिक लक्षवेधक करत हॅरियरमध्ये आकर्षक आर१७ टायटन फोर्ज अलॉइ आणि दरवाज्यांवर सिग्नेचर ब्रॅड मॅस्कॉट आहे, तर सफारीमध्ये आकर्षक आर१८ अॅपेक्स फोर्ज अलॉइसह स्वत:चे आयकॉनिक मॅस्कॉट आहे. यामधून या एसयूव्हींचा संपन्न वारसा प्रशंसित करण्यात आला आसून समकालीन आकर्षकता देखील दिसून येते.
एक्स्प्लोरर्ससाठी डिझाइन करण्यात आलेल्या, तसेच साहसी प्रवासासाठी सुधारित करण्यात आलेल्या टाटा सफारी अॅडव्हेंचर एक्स आणि हॅरियर अॅडव्हेंचर एक्स या दोन विशिष्ट अवतारांमध्ये क्षमता, आरामदायीपणा व लक्षवेधक आकर्षकता आहे. सफारी अॅडव्हेंचर एक्स टॅन ओन-प्रेरित लेदरेटमधील अॅडव्हेंचर ओक इंटीरिअर्स आणि शिल्पाकृती डॅशसह वरचढ ठरते, तर हॅरियर अॅडव्हेंचर एक्स केबिनमध्ये टॅन अॅसेंट्स असलेल्या काळ्या रंगाच्या लेदरेट सीट्ससह प्रीमियम ओनिक्स ट्रेल इंटीरिअर्सच्या माध्यमातून एसयूव्हीची क्षमता सादर करते.
आजच्या पिढीसाठी डिझाइन करण्यात आलेली स्मार्टर लाइन-अप**
अॅडव्हेंचर एक्सच्या पदार्पणासह टाटा मोटर्सने संपूर्ण हॅरियर व सफारी पोर्टफोलिओला नवीन लुक दिला आहे, ज्यामुळे ही श्रेणी आता अधिक स्मार्ट, अधिक सर्वोत्तम आणि आजच्या एसयूव्ही ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षांची संलग्न झाली आहे. ही नवीन लाइन-अप तुमच्या जीवनशैलीला साजेशी आकर्षक एसयूव्हीची निवड करणे अधिक सोपे करते. हॅरियर किंवा सफारी आता सर्वोत्तम तंत्रज्ञान, आकर्षक डिझाइन किंवा शक्तिशाली क्षमता अशा सर्वोत्तम वैशिष्ट्यांसह डिझाइन करण्यात आली आहे. या लाइन-अपची खासियत म्हणजे ऑल-न्यू अॅडव्हेंचर एक्स परसोना, जी आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली अभिव्यक्ती आहे आणि त्यामध्ये सिग्नेचर डिझाइन, ऑफ-रोड सुसज्जता व प्रीमियम वैशिष्ट्ये आहेत.
*किमती फक्त ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वैध आहेत.
