धम्मप्रसारक अविनाश कांबळे यांची रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि.5- बौध्द धम्मचळवळीतील अग्रेसर धम्मप्रसारक अविनाश कांबळे यांची रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्याची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजा सरवदे राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम आणि राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी अविनाश कांबळे यांचे अभिनंदन केले आहे.
युनायटेड बुध्दीस्ट फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष असणारे अविनाश कांबळे हे बौध्द धम्माच्या अनेक जागतीक धम्म परिषदामध्ये सहभागी झालेले आहेत.धम्म परिषद आणि धम्म चळवळीच्या प्रसारासाठी अविनाश कांबळे जगभर प्रवास करीत असतात.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहभागातुन स्थापन झालेल्या वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दीस्ट या बौध्दांच्या जागतीक शिखर संघटनेच्या स्टँडिंग कमिटीचे अविनाश कांबळे उपाध्यक्ष आहेत.केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या समवेत अविनाश कांबळे यांनी अनेक बौध्द धम्म परिषदा यशस्वी केलेल्या आहेत.धम्मदिक्षा सुवर्ण महोत्सव मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स येथे सन 2006 साली ऐतिहासिक गर्दीत साजरा करण्यात झाला.त्या धम्मदिक्षा सुवर्ण महोत्सवाच्या संयोजनात अविनाश कांबळे यांनी महत्वाची भुमिका पार पाडली होती. नुकताच 16 डिसेंबर 2024 रोजी मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सवर धम्म दिक्षा महोत्सव साजरा झाला. त्यात ही अविनाश कांबळे मुख्य संयोजक होते.
बौध्द धम्म चळवळीत अविनाश कांबळे यांचे भरीव योगदान आहे.धार्मीक चळवळी सोबत राजकीय चळवळीचे काम करण्याचा अविनाश कांबळे यांनी निर्णय घेतला.बोधिसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले देशभर चालवत आहे.त्यांचा आपल्याला अभिमान असल्यामुळे आपण ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात काम करण्याचा निर्णय घेतला. माझ्यावर विश्वास ठेऊन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मला महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्या बद्दल त्यांचे आभार अविनाश कांबळे यांनी मानले आहे आहेत.
हेमंत रणपिसे
प्रसिद्धी प्रमुख
