टोयोटा किर्लोस्कर मोटरने जुलै २०२५ मध्ये ३२,५७५ युनिट्सची विक्री केली
बेंगळुरू, १ आँगस्ट: टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम)ने आज त्यांच्या विक्री कामगिरीची घोषणा केली. कंपनीने जूलै २०२५ मध्ये एकूण ३२ हजार ५७५ यूनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत त्यात ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. यात देशांतर्गत विक्रीचे प्रमाण हे अंदाजे २९ हजार १५१ यूनिट्स तर निर्यात केलेल्या यूनिट्सचे प्रमाण ३४१६ इतके आहे. कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीत तब्बल १४ टक्क्यांची वाढ झाली आहे.
टोयोटा ग्लॅन्झा आणि अर्बन क्रूझर हायरायडरसाठी विशेष लिमिटेड एडिशन प्रेस्टिज पॅकेजेससाठी बाजारपेठेतून प्रेरणादायी प्रतिसाद मिळाला आहे. त्याचा फायदा विक्रीच्या टक्केवारीवर दिसून आला आहे. तर दुसरीकडे, इनोव्हा हायक्रॉसला भारत एनसीएपीकडून प्रौढ व्यक्ती व लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिष्ठित ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले, ज्यामुळे टोयोटाला सुरक्षितता नेतृत्वामधील मोठा टप्पा गाठता आला. टोयोटा ग्लॅन्झाच्या सर्व व्हेरिएण्ट्समध्ये प्रमाणित म्हणून भर करण्यात आलेल्या सहा एअरबॅग्ज ड्रायव्हर आणि प्रवाशांना सर्वसमावेशक संरक्षण देतात.
कंपनीच्या या यशाबाबत युज्ड कार बिझनेसच्या विक्री व सेवेचे उपाध्यक्ष वरिंदर वाधवा म्हणाले की, ”आम्हाला जुलै २०२५ मध्ये ३ टक्के वाढीसह ३२,५७५ युनिट्सची विक्री करण्याचा आनंद होत आहे. एकूण, आमच्यासाठी बाजारपेठेत स्वीकृती सातत्यपूर्ण राहिली आहे, ज्यामधून ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाप्रती आमची अविरत कटिबद्धता दिसून येते. बाजारपेठेला उच्च दर्जाची उत्पादने आणि सुधारित पोहोचच्या माध्यमातून मूल्यवर्धित सेवा देण्यावर आमची सतत लक्ष केंद्रित करू, जे आगामी महिन्यांमध्ये प्रमुख विकास स्रोत ठरतील, असा आमचा विश्वास आहे.”
