February 16, 2026

आता क्रीडा क्षेत्रातही ऑनलाइन रमी सुरु होणार का ?

0
sanvidhan_news_150x150
Spread the love


जे मंत्री महोदय भर विधानसभेत स्वतःचे कर्तव्य विसरून शेतकऱ्यांचे संवेदनशील प्रश्न न सोडवता ऑनलाइन रमी खेळत होते तसेच शेतकऱ्यांबद्दल सतत वादग्रस्त विधानही करत होते इतके असंवेदनशील मंत्र्यावर कोणतीही कारवाई न होता त्यांना राज्याचे क्रीडामंत्री पद बहाल केले जाते ही अत्यंत निंदनीय बाब म्हणावी लागेल…
एकतर राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील अनेक प्रश्न व वादविवाद क्रीडा संचालनालयात तसेच न्यायालयात प्रलंबित आहेत त्याचं प्रमाणे अनेक अनागोंदी कारभाराने क्रीडाक्षेत्र चर्चेतही आहे , अनेक क्रिडापटू न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत त्यात आता हे वादग्रस्त कृषिमंत्री (ऑनलाईन रमी मंत्री ) क्रिडामंत्री झाले म्हणजे आता क्रीडापटूंनी खेळ खेळायचे की क्रीडांगणावर रमी खेळायची ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जे शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही ते क्रीडाक्षेत्राला न्याय देऊ शकणार का ? क्रीडाक्षेत्रातील अनेक संवेदनशील प्रश्न हे सोडवू शकतील का ? त्यामुळे क्रीडाक्षेत्राची व क्रीडापटूंच्या भवितव्याची जाण असलेले मंत्रीच क्रिडामंत्री असावेत अशी मागणी आमचे क्रिडा समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचा वतीने या प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात येत आहे… आपले, लतेंद्र भिंगारे,अध्यक्ष , क्रीडा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी