February 15, 2026

दादागिरी करण्यापेक्षा राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना सैन्यात पाठवावे ~केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

0
IMG-20250718-WA0036
Spread the love

मुंबई दि.18 ~ केवळ संविधान दाखवून चालणार नाही तरआपल्याला संविधानातला भारत उभा करावा लागणार आहे.असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वाळवा येथे केले.मराठीच्या मुद्दयावरुन बोलताना राज ठाकरे यांनी दादागीरी करु नये.करायचीच असेल तर मनसेच्या कार्यकर्त्यांना लष्करात पाठवावे असे आवाहनही केले.येथील हुत्मा शिक्षण उद्योग समुहाच्या वतीने पद्मभुषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांच्या 103 व्या जयंती कार्यक्रमात ना. रामदास आठवले अध्यक्षस्थानावरून बोलत होते.ना.रामदास आठवले,पाशा पटेल,अविनाश धर्माधिकारी यांनी नागनाथअण्णा यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले.
नागनाथअण्णा यांनी पँथर चळवळीला मोठी मदत केली.त्यामुळे मला मंत्री होता आले.ते माझ्या प्रचाराला दोन वेळा आले होते.त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला मोठी ताकद देऊन स्वातंत्र्य लढ्याचे सैनिक म्हणून अण्णांचे क्रांतिकारी योगदान आहे. त्यांच्या योगदानामुळे धरणग्रस्त,दुष्काळग्रस्त व उपेक्षतांना न्याय मिळाला.त्यांच्या पाठिशी वाळव्याची ताकद होती.त्यांनी निवडुन आलेल्या चार रिपब्लिकन खासदारांना एकत्र केले.आता हे कोणालाही शक्य नाही असे ते म्हणाले.क्रांतिवीर नागनाथ अण्णा यांचे नाव टेंभु योजनेला देण्यासाठी प्रयत्न करेन. त्यांच्या स्मारकासाठी खासदार निधितुन 50लाख रुपये दिल्याचे जाहिर करुन,स्मारकासाठी उर्वरित 5 कोटी रुपये मिळावेत म्हणुन प्रयत्न करेन अशी घोषणा ही ना .रामदास आठवले यांनी केली.

नागनाथ अण्णा यांनी चळवळीच्या आम्हाला टाटा सुमो गाडी दिली होती. त्यांचे काँग्रेस शी पटत नव्हते .ते डाव्या विचारांचे होते.माझ्यावर त्यांचा खूप विश्वास आणि प्रेम असल्यामुळे माझ्या लोकसभा निवडणूक प्रचाराला ते आले होते. असे सांगत नागनाथ अण्णांच्या अनेक आठवणींना ना.रामदास आठवले यांनी उजाळा दिला.
यावेळी वैभव नायकवडी यांनी प्रास्ताविक केले.गौरव नायकवडी यांनी मानेगत व्यक्त केले.यावेळी प्राचार्य आर एस चोपडे,शिवाजीराव काळुनगे,प्राचार्य सुषमा नायकवडी,नंदिनी नायकवडी,विरधवल नायकवडी,केदार नायकवडी,डॉ.सुरेश कदम,विशाखा कदम,वसंत वाजे,विलास थोरात,बाळासाहेब पाटील उपस्थित होते.बाळासाहेब नायकवडी यांनी आभार मानले. रिपब्लिकन पक्षाचे उत्तम कांबळे; राजेंद्र खरात; विनोद निकाळजे; श्वेतपद्म कांबळे; वाळवा चे सरपंच संदेश कांबळे:वाळवा चे रिपाइं तालुका अध्यक्ष सुधीर कांबळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

हेमंत रणपिसे
प्रसिद्धी प्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी