February 15, 2026

अग्रवाल समाज फेडरेशन महिला समितीच्या वतीने सिंधारा, सांस्कृतिक कार्यक्रम हर्ष उल्हासात संपन्न

0
IMG-20250721-WA0241
Spread the love

पुणे – अग्रवाल समाज फेडरेशन महिला समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यात महिलांसाठी, महिलांद्वारे आयोजित “क्लब ऑफ वीमेन C-O-W” द्वारा 250 हुन अधिक महिलांना सोबत घेऊन देवीचा सिंधारा कार्यक्रम जोशात संपन्न झाला. यावेळी पुण्यातील लोणावळा येथील नारायणी धाम, कार्ले येथील महालक्ष्मी माता, – महाराजा अग्रसेन पॅलेस, देहू येथील महालक्ष्मी मंदिर आणि आकुर्डी येथील माता वैष्णो देवी मंदिरांना भेट देण्यात आली. उपस्थित सर्व महिलांच्या हस्ते देवीला चुनरी व शृंगार, फळे, मेवा, मिठाई, प्रसाद अर्पण करण्यात आले. यावेळी सर्व महिलांनी भजन आणि नृत्याच्या माध्यमातून दादीजी आणि महालक्ष्मी मातेला प्रसन्न केले. विविध भजन, मातेची आरती यामुळे भक्तीमय वातावरण सर्वत्र पहायला मिळाले. या सिंघाडाचे आयोजन अग्रवाल समाज फेडरेशन महिला समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यात महिलांसाठी, महिलांद्वारे आयोजित “क्लब ऑफ वीमेन C-O-W” द्वारा करण्यात आले होते. यावेळी अग्रवाल समाज फेडरेशनचे अध्यक्ष श्री. कृष्णकुमारजी गोयल व त्यांची धर्मपत्नी सौ. राजबाला गोयल, उपाध्यक्ष श्री. विनोदजी बंसल, मुख्य कार्यकारिणी सदस्य श्री. नंदकुमारजी गुप्ता व त्यांची धर्मपत्नी सौ. मीनाजी गुप्ता यांची विशेष उपस्थिती लाभली. वैष्णो माता मंदिरातील श्री. विजयजी सिंगल, सौ. सरलाजी सिंगल, श्री. अशोकजी, तसेच प्राधिकरण महिला समितीच्या अध्यक्षा लताजी, मीनलजी, रजनीजी व कार्यकारिणी सदस्य यांनी सर्वांचे स्वागत केले. या कार्क्रमाचे आयोजन C-O-W संस्थेच्या अध्यक्ष नीता अग्रवाल , उपाध्यक्ष मीणा गोयल उषा तुलस्यान, सेक्रेटरी लक्ष्मी बंसल, खजिनदार मीनाक्षी अग्रवाल, वर्किंग कंमिटी सुजाता, अश्विनी, निर्मला यांनी केले. आकुर्डी येथील मंदिरामध्ये विश्वास ताकि यांच्या वतीने सर्व बहिणींसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती, तसेच देहू रोड अग्रवाल समाजाच्या वतीनेही मंदिरात सर्व बहिणींचे स्वागत व नाश्त्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी बोलताना कृष्णकुमार गोयल म्हणाले, ” आज अग्रवाल समाजाच्या महिला मोठ्या प्रमाणात बाहेर पडून या सगळ्या गोष्टीचा आनंद घेत आहे हें माझ्या साठी खूप कौतुकाची बाब आहे. आजच्या आधुनिक काळात देखील आमच्या या महिला आज आपली संस्कृती देखील जपताना दिसत आहे. अशाच प्रकारे महिलांनी अनेक उपक्रम राबवावे मी त्यांच्या पाठीशी उभा आहे. “

नीता अग्रवाल म्हणाले, ” दरवर्षी महिलांसाठी श्रावण महिन्यात हा कार्यक्रम आपण करत असतो महिला देखील अगदी उत्साहाने यामध्ये आपला सहभाग नोंदवतात यंदा अडीचशे होऊन अधिक महिला यामध्ये सहभाग झाल्याने आम्हाला अतिशय आनंद झाला त्याचबरोबर यावेळी दादी जी का खजाना हा एक आकर्षक खेळ आम्ही महिलांसाठी ठेवला यामध्ये दीडशेहून अधिक लकी ड्रॉ विनर्स निवडले गेले. “

यावेळी सहभाग झालेल्या महिलांनी या कार्यक्रमाची प्रशंसा केली. त्याचबरोबर कार्यकारणीला अनेक शुभेच्छा देखील दिल्या अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी महिलांनी या क्लबचे सभासत्व स्वीकारले आहे. पुणे जिल्ह्यातील एक आदर्श आणि प्रतीक म्हणून या क्लब कडे पाहण्यात येईल अशी भावना ही यावेळी महिलांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी