February 15, 2026

राहुल गांधी संविधानाचा अवमान करीत आहेत ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

0
sanvidhan_news_150x150
Spread the love

बिहारमध्ये काँग्रेस आणि आर जे डी समाजात फूट पाडत आहे

रिपब्लिकन पक्षातर्फे आयोजित इन्साफ संमेलनाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते उद्घाटन

पटना / मुंबई दिनांक 13 ~ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अल्पसंख्यांकांच्या विरोधात नाही.उलटपक्षी मोदींनी सर्व गरिबांसाठी सुरू केलेल्या 10 टक्के आरक्षणाचा लाभ अल्पसंख्यांकांना होत आहे. जनधन योजना मुद्रा योजना आयुष्यमान योजना आदी अनेक योजनांचा देशभरात अल्पसंख्यांकांना लाभ मिळत आहे.काँग्रेस आणि राजद बिहार मध्ये धर्माच्या जातीच्या नावाने समाजात फूट पडत आहे.काँग्रेस नेते राहुल गांधी संविधानाच्या नावाचे कव्हर असणारे पुस्तक दाखवून पवित्र संविधान ग्रंथाचा अवमान करीत आहेत.समाजात फूट पाडणारे आणि निवडणुकांवर सतत शंका घेऊन लोकशाही प्रक्रियेचा संविधानाचा अवमान राहुल गांधी करीत आहेत अशी घणाघाती टीका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज पटना येथे केली.पटना येथे रिपब्लिकन पक्ष आणि पिछाडा मुस्लिम समाजाच्या वतीने इन्साफ संमेलन चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे आदिल असगर अडी अनेक मान्यवर उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात बिहार मध्ये एन डी ए ला पुन्हा स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी