February 15, 2026

चिमुकल्यांनी मातृपूजनाने साजरी केली गुरुपौर्णिमाDES डेक्कन एज्युकेशन सोसायटी टिळक रोड..

0
IMG_20250710_142623
Spread the love

पुणे : भारतीय संस्कृतीत गुरूंना परमेश्वराचे स्थान दिले आहे. आई-वडील हे प्रत्येकाचे पहिले गुरु. त्यामुळे बालवाडीतील चिमुकल्यांनी मातृपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी केली. आजच्या बदलत्या काळात विभक्त कुटुंब पद्धतीत आईचे महत्व चिमुकल्यांना समजावे, याकरिता या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
DES टिळक रोड शाळेच्या वतीने शाळेच्या प्रांगणात गुरुपौर्णिमेनिमित्त मातृपूजन हा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी वंचित विकास संस्थेच्या निशा जोशी शाळेच्या मुख्याध्यापिका आदी उपस्थित होते.
निशा जोशी म्हणाल्या, मुलांना व्यायाम करायला शिकवणे, ही आजची गरज आहे. शरीरसंपदा ही खरी संपत्ती आहे. आपण कसे वागतो, त्याप्रमाणे मुले अनुकरण करतात. त्यामुळे प्रत्येक पालकाची वागणूक चांगली असायला हवी. मुलांना स्वतःचा विचार स्वतः करायला शिकवायला हवे.
म्हणाले, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव ही आपली संस्कृती आहे. लहानपणापासून सर्व काही करणारी ही प्रत्येकाची आई असते. ती जाणीव मुलांना करून देणारा हा काळ आहे. आपल्या मुलांनी उत्तम नागरिक व्हावे, असे वाटत असेल तर प्रत्येक पालकांनी मुलांना वेळ द्यायला हवा. भारताचा सुजाण नागरिक घडविण्यास कटिबद्ध होण्याचा गुरुपौर्णिमा हा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले. मोबाईलच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना त्यापासून लांब ठेवणे आवश्यक आहे. पालकांचे अनुकरण विद्यार्थी करतात हे लक्षात ठेवून, आपण वागले पाहिजे असे निशा जोशी यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी