February 15, 2026

डॉ. आशुतोष जावडेकर यांना रंगत-संगत प्रतिष्ठनचा काव्य प्रतिभा पुरस्कार

0
IMG-20250707-WA0024
Spread the love

पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या काव्य प्रतिभा पुरस्काराने प्रसिद्ध व्याख्याते, लेखक, कवी डॉ. आशुतोष जावडेकर यांना गौरविले जाणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. 13 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत लेखक, कवी डॉ. राजा दीक्षित यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यंनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात बंडा जोशी, प्रमोद खराडे, माधव हुंडेकर, मृणालिनी कानिटकर-जोशी, तनुजा चव्हाण, वर्षा बेंडिगेरी-कुलकर्णी, स्वप्नील पोरे, सुजित कदम, विजय सातपुते, डॉ. मृदुला कुलकर्णी-खैरनार यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
फोटो : डॉ. आशुतोष जावडेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी