February 15, 2026

डॉ. बाबासाहेब कांबळे यांना छत्रपती शाहूजी महाराज पुरस्कार

0
IMG-20250626-WA0079
Spread the love

पुणे : फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहूजी महाराज पुरस्काराने महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब कांबळे यांचा गौरव केला जाणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभ बुधवार, दि. 2 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला असून पुरस्काराचे वितरण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. माजी नगरसेविका लता राजगुरू यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य संयोजक विठ्ठल गायकवाड यांनी निवेदनाद्वार कळविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी