February 15, 2026

सोनाली मारणे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

0
IMG-20250627-WA0148
Spread the love

पुणे : कॉँग्रेस पक्षाच्या माजी महिला पुणे शहराध्यक्ष, प्रदेश सचिव सोनाली मारणे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या सह शिवसेना नेते उपस्थित होते. 

या विशयो बोलताना सोनाली मारणे यांनी म्हंटले आहे की,  2011 पासून कॉंग्रेस पक्षाची कार्यकर्ती म्हणून मी काम करत आहे. ज्याप्रमाणे विरोधी पक्ष म्हणून काम पक्षाने करायला हवा त्याप्रमाणे पक्ष काम करताना दिसत नाही याची खंत वाटते. जे काम करू शकतात त्यांना योग्य न्याय दिला जात नव्हता.  यामुळेच लाडक्या बहीण योजनेचे शिल्पकार व स्वतःला DCM(Dedicated common man) समजणार्‍या, मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महाराष्ट्र हितासाठी घेतलेले धडाडीचे निर्णय यामुळे प्रभावित होऊन शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण 80% समाजकारण 20% राजकारण हे तत्त्व तंतोतंत पळणारे एकनाथ शिंदे सर्वसामान्यांच्या जवळ चे वाटतात.

यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक राहुल तुपेरे, मंगल पवार, मीनल धनवटे , प्रमोद बारहाते , लक्ष्मीकांत गोनेकर , भक्ती गाटे, किरण मारणे, प्रथमेश धुमाळ, महेश पवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी