उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हिंदीबद्दल भूमिका घेणे हे बरोबर नाही – रामदास आठवले
मुंबई दि.26 ~ महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून त्रिभाषा सूत्राचा अलवंब करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या एकूण मुद्द्यावर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. त्रिभाषा सर्वांना यायला हवी. हिंदी आणि इंग्रजी देखील बोलता येणे आवश्यक आहे. मराठी ही आपली मातृभाषा आहेच, आम्हाला सर्वांना देखील मराठीचा अभिमान आहे. मराठी भाषेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सगळेच विषय शिकवा अशा पद्धतीचा कुठलाही आदेश नाही. हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने त्याला नकार देणे बरोबर नाही’, असे वक्तव्य ना .रामदास आठवले यांनी केले.
सरकारने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्या दबावात येता कामा नये. उद्धव आणि राज यांनी हिंदीबद्दल भूमिका घेणे बरोबर नाही. ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान विरुद्ध भूमिका आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य तो निर्णय घ्यावा आमचा पक्ष त्यांच्यासोबत आहे. मराठी हा मुद्दा घ्यायला काही हरकत नाही. पण महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर हिंदी बोलावं लागतं. आम्ही शाळेत शिकत असताना त्यावेळेस इंग्रजी विषय होता. मी परदेशात गेलो, तर त्या ठिकाणी इंग्रजी भाषा शिवाय पर्याय नाही.’
‘आपण सगळे मराठी आहोतच पण हिंदी आपली राष्ट्रभाषा असल्याने तिचा अवमान होता कामा नये. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. मुंबईसारख्या ठिकाणी बहुभाषिक लोक राहतात. अनेक राज्यातील मुले देखील मुंबईत मराठीत बोलतात, मी त्यांना पाहिलं आहे. राष्ट्रभाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे’, असे
ना .रामदास आठवले म्हटले.
हेमंत रणपिसे
प्रसिद्धी प्रमुख
