February 15, 2026

पं. द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे ‌‘मम सुखाची ठेव‌’नटसम्राट बालगंधर्व यांच्या नाट्यगीतांवर आधारित अनोख्या कार्यक्रमाचे आयोजनप्रसिद्ध गायिका विदुषी मंजुषा पाटील सादर करणार लोकप्रिय नाट्यगीते

0
IMG-20250623-WA0031
Spread the love

पुणे : संगीताचार्य पं. द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे नटसम्राट बालगंधर्व यांच्या अजरामर नाट्यसंगीतावर आधारित ‌‘मम सुखाची ठेव‌’ हा सुरेल आविष्कार रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका विदुषी मंजुषा पाटील लोकप्रिय नाट्यगीते सादर करणार आहेत.
कार्यक्रम गुरुवार, दि. 26 जून रोजी सायंकाळी 6 वाजता बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड येथे आयोजित करण्यात आला आहे.
गुरुवारी (दि. 26) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ‌‘स्वयंवर‌’, ‌‘एकच प्याला‌’, ‌‘सौभद्र‌’, ‌‘मानापमान‌’ अशा विविध सुप्रसिद्ध संगीत नाटकातील लोकप्रिय पदे रसिकांना ऐकावयास मिळणार आहेत. प्रशांत पांडव, राहुल गोळे, प्रसाद जोशी, श्रुती भावे, अपूर्व द्रविड साथसंगत करणार असून ज्येष्ठ नाट्य कलावंत रवींद्र खरे यांचे अभ्यासपूर्ण निवेदन असणार आहे. कार्यक्रम सशुल्क आहे.
संगीताचार्य पं. द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान नटसम्राट बालगंधर्व यांच्या जयंतीनिमित्त 2007 पासून कार्यक्रम आयोजित करत असत. दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमात विदुषी मंजुषा पाटील आणि अनेक प्रथितयश कलाकार कार्यक्रम सादर करीत आले आहेत. या वर्षीचा कार्यक्रम सुमारे दहा वर्षांच्या कालखंडानंतर सादर होणार आहे. बालगंधर्व यांच्या अजरामर नाट्यगीतांवर आधारित कार्यक्रम काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाविषयी बोलताना विदुषी मंजुषा पाटील म्हणाल्या, काणेबुवा हे बालगंधर्व यांचे भक्त होते. माझे गुरू, संगीताचार्य द. वि. काणेबुवांना त्यांचे सान्निध्य अनुभवता आले होते. पुण्यात असताना अनेक वेळा बालगंधर्वांकडे जायचे. त्यामुळे बालगंधर्व यांचा सहवास काणेबुवांना लाभला .काणेबुवांनी जरी बालगंधर्व यांच्याकडून थेट शिक्षण घेतले नसले तरी एकलव्याप्रमाणे त्यांनी बालगंधर्व यांच्या गायकीवर भक्ती आणि प्रेम केले आणि त्याचा अभ्यास केला बालगंधर्व यांची गायकी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. माझे गुरू काणेबुवा यांनी अतिशय प्रेमाने मला ती गायकी शिकवली हे माझे भाग्य आहे. बालगंधर्व यांचे वास्तव्य पुण्यात होते त्यामुळे पुण्यात या कार्यक्रमाचे आयोजन करताना विशेष आनंद होत आहे.
फोटो : विदुषी मंजुषा पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी