February 16, 2026

आडकर फौंडेशनतर्फे शुक्रवारी होणार गौरवरवी वाघ यांना डॉ. हेलन केलर स्मृती पुरस्कार जाहीर

0
IMG-20250623-WA0029
Spread the love


पुणे : आडकर फौंडेशनतर्फे ज्येष्ठ दृष्टीहीन, मूकबधीर सामाजिक कार्यकर्त्या डॉ. हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त दिल्या जाणाऱ्या डॉ. हेलन केलर स्मृती पुरस्काराने ऑल इंडिया ब्लाईंड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रवी वाघ यांचा गौरव केला जाणार आहे. दृष्टहीन अथवा मूकबधिर कर्तबगार व्यक्तीस हा पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो.
पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार, दि. 27 जून रोजी सकाळी 11 वाजता नवी पेठेतील पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते होणार असून नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाईंडचे राष्ट्रीय सल्लागार दिलीप शेलवंते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त ‌‘अंधारातून प्रकाशकाडे‌’ या विषयावरील सकारात्मक कविता वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात हेमंत केतकर, मीनाक्षी नवले, कांचन सावंत, स्वाती यादव, विजय सातपुते, सुजित कदम, तनुजा चव्हाण, प्रतिभा पवार, रसिका शाळिग्राम, मनीषा सराफ, स्वप्नील पोरे, प्रभा सोनवणे यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
फोटो : रवी वाघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी