February 15, 2026

श्री महालक्ष्मी मंदिरतर्फे वारकऱ्यांची आरोग्य तपासणीप्राथमिक औषधे व प्रसाद वाटप ; सत्य साई सेवा संघटनेच्या सहकार्याने उपक्रम

0
IMG-20250622-WA0045
Spread the love


पुणे : सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने मंदिरामध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो वारकऱ्यांनी मंदिरात देवीचे दर्शन घेत आरोग्य सेवेचा लाभ घेतला.

या उपक्रमास मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल व प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मंदिराचे विश्वस्त हेमंत अर्नाळकर, मिलिंद राहुरकर गुरुजी तसेच कार्यकर्ते दत्तात्रय राळेभात, शशिकांत धर्माधिकारी , काशीनाथ सकट, गजानन पुंडले यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वारकऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली. तसेच प्रसाद वाटप देखील करण्यात आले. दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन मंदिरातर्फे केले जाते. यावेळी सत्य साई सेवा संघटना पुणे यांच्या डॉक्टर व सेवकांनी सहकार्य केले.

  • फोटो ओळ : सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने मंदिरामध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन मंदिरात करण्यात आले होते. यावेळी हजारो वारकऱ्यांनी मंदिरात देवीचे दर्शन घेत आरोग्य सेवेचा लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी