बालग्राम, येरवडा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजराअॅड. शार्दुलराव सुधाकरराव जाधवर विधी महाविद्यालय, पुणे यांचा उपक्रम
पुणे : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, अॅड. शार्दुलराव सुधाकरराव जाधवर विधी महाविद्यालय, पुणे यांच्या वतीने एसओएस बालग्राम, येरवडा येथे विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्राचे मार्गदर्शन योग प्रशिक्षक नेहा नाटेकर यांनी केले.
त्यांनी ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, अनुलोम-विलोम, ध्यानधारणा यांचे योग्य व सहज मार्गदर्शन केले. त्यांच्या दिलखुलास आणि प्रेरणादायी शैलीमुळे उपस्थितांनी आनंदाने सहभाग नोंदवला. या समाजोपयोगी उपक्रमामागे संस्थापक डॉ. सुधाकरराव जाधवर व अध्यक्ष अॅड. शार्दुलराव सुधाकरराव जाधवर यांचे दूरदर्शी मार्गदर्शन व प्रेरणा लाभली. त्यांची “शिक्षण हे समाजासाठी” ही धारणा या उपक्रमातून प्रत्यक्षात उतरली.
कार्यक्रमाचे नेतृत्व प्राचार्या डॉ. सपना सुकृत देव यांनी केले. त्यांच्याच संकल्पनेतून या उपक्रमाची आखणी झाली. विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला आणि मुलांसोबत संवाद साधून योगाचे महत्त्व समजावले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने झाली. त्यानंतर सामूहिक योग सत्र, श्वसन तंत्र, मौन ध्यान आणि आरोग्य विषयक माहितीपट दाखवण्यात आला.
- फोटो ओळ : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, अॅड. शार्दुलराव सुधाकरराव जाधवर विधी महाविद्यालय, पुणे यांच्या वतीने एसओएस बालग्राम, येरवडा येथे विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सहभागी योगप्रेमी.
