५०० विद्यार्थांनी अनुभवले योगासनांची प्रात्यक्षिके
पुणे : जागतिक योग दिनाच्या निमित्ताने बाजीराव रस्त्यावरील नुमवीतील विद्यार्थ्यांकरिता साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि वीर शिवराज मंडळाचा संयुक्त विद्यमाने योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी लाभ घेला.
शाळेचे माजी विद्यार्थी योग गुरू विठ्ठल कडू यांच्यासह त्यांची मुले नारायणी कडू (वय १०) आणि सिद्धेश कडू (वय १५) यांनी सुग्रीवासन, हनुमानासन, राजकपोतासन, कोकिळभुजंगासन, पार्श्व पद्मासन, कनिकासन, वामनासन, नटराजासन, कैलासासन आणि कमरमरोडासन अशी एकापेक्षा अवघड आसने सादर करून विद्यार्थ्यांना अचबिंत केले. आमदार हेमंत रासने यांची प्रमुख उपस्थिती होती.
तन, मन, आत्मा, बुद्गी आणि एकाग्रता यांची उत्तम सांगड घालणारी साधना म्हणजेच योग साधना आहे. विद्यार्थांनी दररोज न चुकता योग करावा; कारण योगामुळेच मन शांत राहते आणि निरोगी शरीर प्राप्त होते, असे आमदार हेमंत रासने म्हणाले.
योगा प्रत्यक्षिक सादर करणारे कडू कुटुंबाचा विशेष सन्मान आमदार हेमंत रासने व पराग ठाकूर यांचा हस्ते करण्यात आला
साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयूष शहा व वीर शिवराज मंडळाचे अध्यक्ष किरण सोनीवाल यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. नूमवि प्रशाला समितीचे अध्यक्ष पराग ठाकूर, नूमवि प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश कांबळे, उपमुख्याध्यापिका, संगीता काळे, लालबहादूर जगताप, दशरथ राजगुरू, अनुजा कांगणे, कुमार अणवेकर, किरण सोनीवाल, नरेंद्र व्यास, गंधाली शाह, अमित कंक आदी उपस्थित होते. पियूष शहा यांनी प्रास्ताविक केले आणि आभार मानले.
फोटो ओळ: साईनाथ मंडळ ट्रस्ट व वीर शिवराज मित्र मंडळांच्या वतीने जागतिक योग दिन निमित नुमवितील ५०० विद्यार्थांनी अनुभवले योगासनांची प्रात्यक्षिके
