February 15, 2026

हॅबिल्‍डचा सर्वाधिक यूजर्ससह योगा दिनी जागतिक विक्रम

0
sanvidhan_news_150x150
Spread the love


पुणे – आंतरराष्‍ट्रीय योग दिन साजरा करत हॅबिल्‍ड या भारतातील पहिल्‍या हॅबिट-बिल्डिंग प्‍लॅटफॉर्मने ‘जागतिक स्‍तरावर ऑनलाइन योग क्‍लासमध्‍ये सर्वाधिक उपस्थिती’ शीर्षकासाठी नवीन जागतिक विक्रम रचला आहे. २१ जून रोजी सकाळी ऑफिशियल वर्ल्ड रेकॉर्डच्या अध्यक्षतेखाली हॅबिल्डचे सौरभ बोथरा यांनी आयोजित केलेल्या सत्रात १६९ देशांमधील ७५२०७४ पेक्षा जास्त सहभागी व्हर्च्युअल पद्धतीने योगा करण्यासाठी एकत्र आले.
नागपूरहून लाइव्‍ह स्ट्रिमिंग करण्‍यासह जगभरात उपलब्‍ध करून देण्‍यात आलेल्‍या या ४५ मिनिटांच्या सत्रात १०० हून अधिक देशांतील योगसाधक एकत्र आले. ज्यामुळे हा सर्वात सर्वसमावेशक व दूरगामी योग इव्‍हेण्‍ट ठरला.
हा हॅबिल्डचा आतापर्यंतचा पाचवा जागतिक विक्रम आहे. जानेवारी २०२४ मध्ये २,४६,२५२ प्रेक्षकांसह यूट्यूबवर योग लाइव्ह स्ट्रिमिंगसाठी सर्वाधिक यूजर्सचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित झाला. त्यानंतर ५,९९,१६२ प्रेक्षकांसह योग धड्यासाठी एकाच दिवसात सर्वाधिक लाइव्ह दर्शकांचा वर्ल्ड रेकॉर्ड युनियनचा किताब आणि २,८७,७११ सहभागींसह व्हर्च्युअल ध्यान वर्गात सर्वाधिक उपस्थिती असा वर्ल्ड रेकॉर्ड युनियनचा किताब मिळवला. २०२३ मध्ये, हॅबिल्डने वर्ल्ड रेकॉर्ड युनियनच्या व्हर्च्युअल योग वर्गात सर्वात जास्त उपस्थितींची नोंद केली होती. ज्यामध्ये १,३४,०५७ सहभागी उपस्थित होते.
या योग सत्रासह हॅबिल्डच्या २१ दिवसांच्या #HarGharYoga उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याला चालना मिळण्‍यासोबत विविध वयोगटातील व्‍यक्‍तींमध्‍ये, भौगोलिक क्षेत्रांमध्‍ये आणि अनुभवी व्‍यक्‍तींमध्‍ये सामुदायिक भावना देखील जागृत झाली.
या कार्यक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत हॅबिल्‍डचे सह-संस्‍थापक आणि प्रमाणित योग प्रशिक्षक सौरभ बोथरा म्‍हणाले, “या विक्रमामधून सहयोगात्‍मक उद्देशाची क्षमता दिसून येते. जगभरातील लोक योगाद्वारे स्वतःला सिद्ध करण्यासारखी छोटी सवय अंगिकारतात, तेव्हा त्याचा परिणाम परिवर्तनशील असतो. या मोहिमेवर विश्‍वास ठेवणाऱ्या आणि #HarGharYoga ला जागतिक चळवळ बनवणाऱ्या प्रत्येक सहभागीचे आम्ही आभारी आहोत.”
या महिन्‍याच्‍या सुरूवातीला हॅबिल्‍डने त्‍यांच्‍या समुदायामध्‍ये १ कोटी व्‍यक्‍तींचा टप्‍पा पार केला. या टप्‍प्‍यासह हॅबिल्‍डने उत्तम सवय अंगिकारण्‍यास आणि उद्देशासह स्‍वास्‍थ्‍याची काळजी घेण्‍यास प्रेरित करण्‍यामध्‍ये अग्रणी म्‍हणून आपले स्‍थान दृढ केले आहे. यासह पुष्‍टी मिळते क, सातत्‍याने लहान-लहान प्रयत्‍न करत राहिल्‍यास विक्रमी परिवर्तन घडू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी