श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे व दोस्त मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान व आरोग्य सेवा दिंडी
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे व दोस्त मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान व आरोग्य सेवा दिंडी
पुणे – श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे व समर्थ युवा फाउंडेशन ने वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले होते. वैद्यकीय शिबिरामध्ये दोस्त मुंबई चे तज्ञ डॉक्टर्स तसेच विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना तपासणी करून औषधांचे वाटप केले. त्यासोबतच गरजू वारकऱ्यांना वेदनाशामक औषधींनी मालिश करून चरण सेवा ही करण्यात आली . दोस्त मुंबईच्या विद्यार्थ्यांनी शनिवार वाडा परिसरामध्ये अवयव दाना विषयक पथनाट्य सादर करत काही वारकऱ्यांचे अवयवादानाचे संकल्प पत्र भरून घेतले.यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणेचे अध्यक्ष संजीव जी जावळे, डॉ कैलास खंडेश्वर जवादे, एम जी एम मेडिकल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
यावेळी बोलताना डॉ कैलास खंडेश्वर जवादे म्हणाले, “श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे व दोस्त मुंबई संयुक्त विद्यमाने एन टी ओ आर सी सेन्सिटिझेशन व प्रमोशन चे कार्य करत आहे. यावर्षी अवयव दान व आरोग्य सेवा दिंडीमध्ये विशेष मोहीम म्हणून एनटीओआरसी सेन्सिटिझेशन ची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत 25 बेड्स, पाच आयसीयू बेड व ऑपरेशन थिएटर ई सुविधा असणाऱ्या रुग्णालयातील वैद्यकीय व्यावसायिक व प्रतिनिधींना एनटीओआरसी बद्दल माहिती देण्यात येणार आहे”.
संजीव जी जावळे म्हणाले, “शिबिरा दरम्यान वृद्ध महिला वारकरी पोटातील दुखणे व उलटीचा त्रास असल्याने दाखवण्यासाठी आली. प्राथमिक तपासणी केली असता तिचा रक्तदाब वाढल्याचे लक्षात आले. तसेच, तिच्या शरीरातील पाणीही कमी असल्याचे लक्षात आल्याने ताबडतोब 108 ॲम्बुलन्स ला पाचारण करून रुग्णास सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. पंढरपूरच्या वारी दरम्यान अशा पद्धतीने बऱ्याच जणांना शरीरातील पाणी कमी होण्याचा त्रास होऊ शकतो. अशातच त्यांना वेळीच उपचार मिळणे महत्वाचे असते. याच गोष्टी विचार घेऊन दर वर्षी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणेच्या वतीने वारकऱ्यांना ही सेवा देण्यात येते.
