गरीबाची रिक्षा….
बालपणापासूनच गरिबी रोज घेते माझी परीक्षा ;
पण प्रवासाची कधी थांबली नाही माझी रिक्षा ;
माझ्या गरीबीची अनेकांनी उडवली खील्ली
माझ्या गरीबीची खिल्ली उडवणाऱ्यांना मी पाहत होतो गल्लोगल्ली;
माझ्या नेत्याने तर दाखवली मला राजधानी दिल्ली;
पण विसरलो नाही मी मुंबई ची गल्ली ;
रिक्षाने रोज फिरतो मी मुंबईच्या गल्लोगल्ली
आता कारवाले हात दाखवतात मला हल्ली ;
त्यांच्या श्रीमंतीला माझी नजर नाही कधी भुलली;
माणुसकी मात्र माझ्या मनात सदैव आहे फुलली!
जीवनात गाडी बंगला नसला तरी जीवनाची गाडी चालते….
खरे मित्र खरी मैत्री नसेल तर जीवनाची गाडी रस्ता बदलते
कलते; संकटाच्या घाटात कोसळते…
म्हणून मित्र रिक्षाने येवो की गाडीने येवो
मित्र खऱ्या मनाने आला पाहिजे;
मैत्री मनाने पक्की असावी नसावी ढिल्ली..
पण कुणा गरीबाची कोणी उडवू नये खिल्ली…. हीच माणुसकीच्या विचारांची मी घेतली दीक्षा…. म्हणून थांबली नाही कधी माझ्या प्रवासाची रिक्षा ..!!!!
जय भीम!!;
हेमंत रणपिसे
