February 15, 2026

स्वरमयी गुरुकुलतर्फे रविवारीपंडित बृज नारायण यांचे सरोद वादन

0
IMG-20250618-WA0031
Spread the love

पुणे : डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचलित स्वरमयी गुरुकुलतर्फे रविवार, दि. 22 जून रोजी जगविख्यात सारंगीवाद पंडित राम नारायण यांचे सुपुत्र व शिष्य पंडित बृज नारायण यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय सरोद वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम सकाळी 10 वाजता जंगली महाराज रस्त्यावरील (छत्रपती संभाजी उद्यानासमोर) स्वरमयी गुरुकुल सभागृह येथे होणार आहे. पंडित अरविंदकुमार आझाद यांची तबलासाथ करणार आहेत. पं. बृज नारायण यांना कुमार गंधर्व सन्मान तसेच संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे…….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी