April 1, 2026

रागेश्री कुलकर्णी यांना पहिला सृजनसाधक पुरस्कारसृजनसभा प्रथम वर्धापन दिनानिमित्त दि. 22 जून रोजी कार्यक्रमपुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त रागेश्री कुलकर्णी यांच्या मैफलीचेही आयोजन

0
IMG-20250616-WA0050
Spread the love

पुणे : युवा कलाकारांच्या पुढाकारातून आकारास आलेल्या आणि शास्त्रोक्त संगीतासाठी समर्पित असलेल्या ‌‘सृजनसभा‌’ संस्थेचा प्रथम वर्धापन दिन आणि सृजनसाधक पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. 22 जून रोजी आयोजित करण्यात आला आहे.
पहिल्या सृजनसाधक पुरस्काराने स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या रागेश्री वैरागकर-कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर त्यांच्या गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सृजनसभा संस्थेचे प्रमुख, संगीतकार होनराज मावळे आणि व्यवस्थापन प्रमुख अक्षदा इनामदार यांनी आज (16) पत्रकार परिषदेत दिली. प्रांजल अक्कलकोटकर, आदिती जोशी, राधा जोशी, वेधा गुमास्त उपस्थित होते.
अकरा हजार रुयपे रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्कराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. 22 जून 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता शिवाजीनगर येथील घोले रोडवरील पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांची प्रमुख उपस्थिती असणार असून त्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी