February 15, 2026

वडाची पाने व पारंब्यांनी सजले लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरवटपौर्णिमा – शास्त्रीय मीमांसा अनोखा उपक्रम ; कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे आयोजन

0
IMG-20250610-WA0033
Spread the love


पुणे : वडाची पाने, पारंब्या, विविधरंगी फुलांनी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली. वडाचे छोटे रोप मंदिराच्या कळसावर ठेवण्यात आले, तसेच पारंपरिक पद्धतीने वडाचे पूजन देखील झाले. केवळ झाडाचे पूजन न करता, वडाचे व वटपौर्णिमेचे महत्व हे शास्त्रीय मीमांसा या कार्यक्रमाद्वारे यावेळी उलगडण्यात आले.

बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे वटपौर्णिमेनिमित्त मंदिरात अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वटपौर्णिमा – शास्त्रीय मीमांसा या उपक्रमांतर्गत या सणाचे शास्त्रीय दृष्ट्या महत्व भाविकांना सांगण्यासोबतच जनजागृतीपर फलक देखील लावण्यात आले.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उप उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनिल रुकारी, राजेंद्र बलकवडे आदी उपस्थित होते. शीतल व अ‍ॅड.संतोष बोबडे यांच्या परिवाराच्या हस्ते दत्तयाग संपन्न झाला.

अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले की आपल्या सणांचे वैज्ञानिक संकल्पना व शास्त्रीय महत्व म्हणजे सर्वात दाट सावली वडाची असते. सर्वाधिक आॅक्सिजनचे उत्सर्जन करणारा वृक्ष म्हणून वडाची ख्याती आहे. वड हा आपला राष्ट्रीय वृक्ष आहे. त्यामुळे याविषयीची परंपरा व संस्कृती ही नव्या पिढीपर्यंत पोहोचवताना त्याबद्दलची शास्त्रीय मीमांसा देखील पोहोचणे गरजेचे आहे. वडाची सावली अत्यंत गुणकारी आहे. यामुळे वडाच्या वृक्षाचा सामाजिक संदर्भ देखील लोकांपर्यंत पोहोचायला हवा. धार्मिक उपक्रमामागील प्राचीन काळापासून प्रगत शास्त्रीय मीमांसा भाविकांसमोर मांडण्याचा ट्रस्टचा उद्देश आहे. जेणेकरून नविन पिढीला त्यामध्ये रूची वाढेल, असेही त्यांनी सांगितले.

  • फोटो ओळ : कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे वटपौर्णिमेनिमित्त मंदिरात अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वडाच्या पारंब्या, पाने व विविध फुलांनी सजावट करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी