February 15, 2026

मध्य पुण्यात धर्मवीर संभाजी महाराज पालखी सोहळा थाटातजनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजन ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

0
IMG-20250608-WA0046
Spread the love


पुणे : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय… जय भवानी, जय शिवाजी… हर हर महादेव… च्या घोषणांनी मध्य पुण्याचा परिसर दुमदुमून गेला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात प्रथमच पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वेशात शंभूभक्तांनी मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात सहभाग घेतला.

जनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधन मंडळाच्या येथून आयोजित धर्मवीर संभाजी महाराज पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्सव समिती, पुणे च्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, ट्रस्टचे प्रकाश ढमढेरे, शिरीष मोहिते, पियुष विजय शहा, निलेश खाणेकर, अनिल ढमढेरे, वसंत खुटवड, हेमंत तिरळे, रोहन जाधव, शंतनू मुक्कावार, ओंकार ठाकूर आदींसह शेकडो शंभूभक्त यावेळी उपस्थित होते.

पालखी सोहळ्यात घोडे, विविध रथ, बँड पथक, शंखनाद पथक, ढोल ताशा पथके सहभागी झाली होती. याशिवाय दिवसभरात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ऍड. हेमंत झंझाड यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन झाले. यामध्ये १८० रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान केले. तसेच शिवकालीन शस्त्र व नाणी यांच्या प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले.

  • फोटो ओळ : जनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधन मंडळाच्या येथून आयोजित धर्मवीर संभाजी महाराज पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्सव समिती, पुणे च्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थित मान्यवर व शंभूभक्त.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी