February 15, 2026

जीवनात मोरयाची उपासना हा प्रथम विषय असावाप.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने ‘श्री गणेश गीतेतील कर्मयोग’ या विषयावर सात दिवसीय निरूपणमालेची सांगता

0
IMG-20250526-WA0030
Spread the love


पुणे : जीवनात दररोज थोडा वेळ उपासना करायची असे ठरवा, मात्र जे ठरवले ते दररोज नित्याने करायला हवे. जमले तर उपासना केली, असे नाही. ठरलेल्या वेळेलाच उपासना व्हायला हवी. उपासना झाली नाही, तर आपल्याला बैचेन वाटायला हवे. त्याकरिता प्राणायाम सारख्या गोष्टी सांगितल्या आहेत. जीवनात मोरयाची उपासना हा प्रथम विषय असायला हवा. त्यानंतर बाकीच्या सर्व गोष्टी करायला हव्या, असे यवतमाळ वणी येथील प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज यांनी सांगितले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ‘श्री गणेश गीतेतील कर्मयोग’ या विषयावरील सात दिवसीय निरूपणमालेचे आयोजन श्रीमंत थोरले बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. त्याच्या सांगता प्रसंगी ते बोलत होते.

प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज म्हणाले, मोरयाची प्राप्ती म्हणजेच आनंद प्राप्ती होय. भगवंताची कृपा म्हणजेच आपल्या आतील आनंदाला धक्का न लागणे, हे आहे. आपण कानाने चांगले ऐकायला हवे. मात्र, आपल्याला ऐकायलाच आवडत नाही. आम्हाला वाईट ऐकायला आवडते, हे दुर्देव आहे. आपण करतो त्या कर्माला उपासनेत परावर्तीत करायचे, असे आपण ठरवायला हवे.

ते पुढे म्हणाले, संसार बदलत राहणार आहे. त्या बदलात आपल्याला अविचल म्हणजेच स्थिर राहायचे आहे. भगवंताच्या जवळ जाऊन पोहोचणे म्हणजे उपासना. ग्रंथातून ज्ञान नाही मिळू शकत, मार्ग मिळू शकेल. मात्र, मार्गक्रमण आपल्यालाच करायचे आहे. आपल्या स्वतःच्या संस्कृतीबद्दल एवढी अवस्था आहे की तेवढी जगात कुठेही नाही. आचमन, प्राणायाम या गोष्टी देखील आपल्याला समजत नाहीत. त्याकरिता गुरूंचे मार्गदर्शन गरजेचे आहे. आपल्याला ईश्वरभक्तीची फक्त हौस आहे. इच्छा नाही, प्रीती नाही. यामध्ये बदल होणे गरजेचे आहे. त्याकरिता ‘श्री गणेश गीतेतील कर्मयोग’ प्रत्येकाने समजून घ्यायला हवा.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, कर्म आणि कर्मयोग यातील फरक, कर्माचा नव्हे तर फलाचा त्याग, अवतार घेण्यामागचे प्रयोजन, अवतारातील कर्मयोग, संत संगतीचे महत्त्व, योगाचे आणि प्राणायामाचे स्वरूप अशा विविध विषयांवर विवेचन करीत श्री गणेशांनी गणेश गीतेतील कर्मयोग स्पष्ट केलेला आहे. या निरूपण मालिकेत या सर्व विषयांचे सविस्तर स्पष्टीकरण स्वानंद पुंड शास्त्री महाराज यांनी केले. ट्रस्टच्या यु ट्यूब आणि फेसबुक चॅनेल वर ही निरूपणमाला गणेशभक्तांना अनुभवण्यास मिळत आहे. तरी गणेशभक्तांनी प्रवचनमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

  • फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ‘श्री गणेश गीतेतील कर्मयोग’ या विषयावरील सात दिवसीय निरूपणमालेचे आयोजन श्रीमंत थोरले बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. याविषयावर सांगतेच्या दिवशी निरूपण करताना यवतमाळ वणी येथील प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी