February 15, 2026

पुणे, पिंपरी-चिंचवडच्या लघुउद्योगांसाठी स्मार्टशिपिंग सुविधेसाठी भरीव

0
sanvidhan_news_150x150
Spread the love

गुंतवणूक पुणे, पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक जडणघडणीत पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातीललघु उद्योगांचा वाटा महत्त्वाचा आहे. या लघु उद्योगांना आंतरराष्ट्रीय पातळीवरव्यासपीठ मिळावे यासाठी फेडएक्स एसएमई कनेक्ट महत्त्वाची भूमिका निभावत आहे.त्याशिवाय पुणे,पिंपरी चिंचवड भागातील लघु उद्योग क्षेत्रात फेडएक्स डिजिटलइंटेलिजन्समध्ये भरीव गुंतवणूक करत आहे.  अनेक कंपन्या कुरिअर,एक्सप्रेस आणि पार्सल डिलिव्हरी सेवांच्या बाजारपेठेत दरवर्षी १७%वाढ होऊन २०२९ पर्यंत १८.३ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, असे संशोधन फर्म मॉर्डर इंटेलिजेंसच्या संशोधन अहवालात म्हटले आहे.त्यानुसार फेडएक्सेने त्यांच्या एसएमई कनेक्टच्या माध्यमातून पुण्यातीललाँजिस्टिक, डिजिटल साधने अद्ययावत करण्यावर भर दिला आहे. यासंदर्भात मार्केटिंग, कस्टमर एक्सपिरियंस आणि एअर नेटवर्क, मिड्ल ईस्ट, इंडियन सबकॉन्टिनेन्ट अँड आफ्रिका (MEISA), फेडएक्सचे उपाध्यक्ष नितीन नवनीत टाटीवालाम्हणाले, “ पुणेपिंपरी चिंचवड भागातील लघु उद्योगांमधील स्मार्ट सोल्यूशन्स, दमदार इन्फ्रास्ट्रक्चरवाढवण्यावर आमचा भर आहे. आमच्या SME कनेक्ट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनआम्ही केवळ पॅकेजिसची डिलिव्हरी करत नाही, तर जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आम्हीSMEs ना महत्त्वाकांक्षी बनवत आहोत.” यासाठी कंपनीने संपर्क, अनुभव,मंत्रा ही नवी प्रणाली दाखल केली आहे. त्याशिवाय या नेटवर्कमध्ये देशातून ये जाकरणाऱ्या २३ साप्ताहिक उड्डाणांचा समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गत फेडएक्सइम्पोर्ट टूल (FiT) रियल टाइम ट्रॅकिंग, डिजिटल दस्तावेजीकरण आणि सक्रिय सुचनांसह आयातसुरळीत होण्यास मदत होते. तर फेडएक्स वन-स्टॉप शॉप या फीचर फेडएक्स एक्सप्रेस आणि फेडएक्स लॉजिस्टिक्स सेवा एकाच यूझर-फ्रेंडलीप्लॅटफॉर्ममध्ये एकत्रित करून लॉजिस्टिक्स सुलभ करते.
दरम्यान, फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन ही जगातील सर्वात मोठी एक्सप्रेसवाहतूक कंपनी आहे, जी 220 पेक्षा जास्त देशांत आणि प्रदेशांत जलद आणि विश्वासार्ह डिलिव्हरीप्रदान करते. महत्त्वाची शिपमेंट नियत दिवशी आणि समयी नियोजित ठिकाणी पोहोचवण्यासाठीफेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन जागतिक हवाई आणि जमीन नेटवर्कचा उपयोग करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी