February 15, 2026

द बाँडी शाँप इंडिया’ची विस्तारीकरण योजना

0
Campaign Still
Spread the love


पुणे, २५ एप्रिल २०२५ : सौंदर्य प्रसाधन क्षेत्रातील कंपनी द बॉडी शॉप इंडियाने नुकतीच आपल्या विस्तारीकरणाची योजना जाहीर केली आहे. त्याअंतर्गत कंपनीने ‘मोअर लव्‍ह फॉर लेस’ मोहिम सुरू केली असून भारतातील त्‍यांच्‍या १२ सर्वात लोकप्रिय उत्‍पादन फॉर्मेट्समध्‍ये स्पर्धात्मक किंमत धोरणाचा अवलंब केला.नवीन धोरणामधून भारतातील ग्राहकांच्‍या प्राधान्‍यक्रमांना प्रतिसाद देण्यासोबतच ब्‍युटी क्षेत्रात अग्रस्‍थानी राहण्‍याप्रती ब्रँडची कटिबद्धता दिसून येते.
आपल्या विस्तारीकरणासंदर्भात द बाँडी शाँप इंडियाची पालक कंपनी क्‍वेस्‍ट रिटेलचे ग्रुप सीईओ राहुल शंकर म्‍हणाले, या लाँचला पाठिंबा देण्‍यासाठीच द बॉडी शॉप इंडियाने आपली ‘मोअर लव्‍ह फॉर लेस’ मोहिम सुरू केली आहे. ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी, बदलते फॅशन ट्रेंड्स यावरही कंपनीने प्रकाशझोत टाकला आहे. या मोहिमेसाठी कंपनीने केलेल्या चित्रिकरणात विविध वयोगटातील कथानकांचा समावेश केला आहे. या धोरणात्मक परिवर्तनासह द बाँडी शाँप उत्पादने कंपनीने अर्थपूर्णरित्या उपलब्ध करून दिली आहेत. नवीन ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्‍यासाठी आणि भारतभरातील विस्‍तारीकरणाला गती देण्‍यासाठी १२ आयकॉनिक फॉर्मेट्सच्या किमतीत धोरणात्‍मकरित्या घट केली आहे.
दरम्यान, इंग्लंडमधील ब्रायटन येथील डेम अनिता रॉड्डिक यांनी १९७६ साली स्थापन केलेला द बॉडी शॉप जागतिक ब्युटी ब्रँड आहे. नीतिमूल्ये आणि शाश्वततेच्या तत्वाचे पालन करत निर्माण केलेल्या उच्‍च दर्जाच्या, निसर्गापासून प्रेरित स्किनकेअर, बॉडी केअर, हेअर केअर आणि मेक-अप उत्पादने देऊ करत जगामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचे द बॉडी शॉपचे प्रयत्‍न आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी