₹२,००० मध्ये कसली दिवाळी? अंगणवाडी सेविका-मदतनीसांना ₹१०,००० भाऊबीज द्या!

सरकारने एकदा स्वतः बाजारात जाऊन दिवाळीचा खर्च करून दाखवावा; मग ₹२,००० मध्ये दिवाळी कशी गोड होते, याचे उत्तर द्यावे. आज साधी साडी आणि ब्लाऊज घेण्यासाठी अडीच ते तीन हजार रुपये खर्च होत असताना, खाद्यतेल, तूप, साखर, रवा, बेसन आणि फराळाचे साहित्य महाग झाले असताना, अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या हातावर ₹२,००० ठेवून त्यांच्या दिवाळीचा गोडवा कसा वाढणार
ही भाऊबीज भेट आहे की महागाईच्या तोंडावर केलेली बोळवण
ज्या महिला गरोदर माता, स्तनदा माता आणि हजारो बालकांच्या पोषणाची जबाबदारी पार पाडतात, शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवतात, त्यांच्याच कष्टांचे मोल एवढे कमी का
दिवसभर काम, विविध नोंदी, सर्वेक्षणे, पोषणविषयक जबाबदाऱ्या आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या या महिलांनी स्वतःच्या कुटुंबासाठी सण साजरा करायचा तरी कसा.
सरकारने केवळ घोषणांचा गोडवा दाखवू नये; महागाईच्या वास्तवाची जाणीव ठेवावी.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळी भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी ₹१०,००० देण्यात यावेत.
त्यांच्या मानधनात महागाईनुसार वाढ करण्यात यावी.
प्रलंबित आर्थिक लाभ आणि इतर देयके वेळेत अदा करण्यात यावीत.
त्यांच्या कामाचा सन्मान राखून आर्थिक व सामाजिक सुरक्षा मजबूत करण्यात यावी.
दोन हजार रुपयांत दिवाळी साजरी करण्याचे गणित सरकारने मांडण्यापेक्षा, दहा हजार रुपये देऊन या भगिनींच्या घरात खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवा लावावा.
लक्षात ठेवा, या महिला केवळ शासकीय योजनांच्या लाभार्थी नाहीत; त्या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या मेहनती कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या कष्टांचा सन्मान हा उपकार नसून न्यायाचा प्रश्न आहे.
₹२,००० ची भेट नको, ₹१०,००० ची सन्मानजनक भाऊबीज द्या
सरकारने या मागणीचा गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा. अशी मागणी प्रशांत कांबळे सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button