राष्ट्रीय शालेय कराटे स्पर्धेत रौप्य पदक…



सी. आय.एस. इ. बोर्ड च्या शालेय कराटे स्पर्धेत विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटी पब्लिक स्कूल मधिल कुमारी स्वरा सचिन जाधव हिने 17 वर्षाखालील वयोगटातील 40 किलो आतील वजन गटात रौप्य पदक प्राप्त केले…या स्पर्धा दिनांक 7 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2026 दरम्यान तामिळनाडू राज्यातील एम. जी. व्ही. अकादमी त्रिपुर येथे संपन्न झाल्या.यामध्ये कर्नाटक, गोवा,केरळ, वेस्ट बंगाल, ओडिशा, नॉर्थ इंडिया, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू इत्यादी राज्यातून सुमारे 800 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता…
या विद्यार्थीसाठी शालेय प्रिन्सिपल सौ. वंदना जोशी, स्पोर्ट्स डिपार्टमेंचे क्रीडा मार्गदर्शक ,श्री.सचिन parte व नितीन चौधरी,यांनी विशेष सहकार्य व मार्गदर्शन केले …
कु.स्वरा जाधव ही बॉऊंडलेस स्पोर्ट्स असोसिएशनच्या कराटे प्रशिक्षण वर्गातील नांदेड सिटी शाखेत मुख्य प्रशिक्षक श्री. श्रीकांत तिळवे सर, तसेच राहुल यादव , किशन सिंग ,शुभम रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण घेत आहे…
कळावे, आपले, लतेंद्र भिंगारे अध्यक्ष बॉऊंडलेस स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button